सचिन जाधव

विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी श्री. चंद्रशेखर पाटील यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी `वलाना ट्रॅक्टर्स`चा शुभारंभ केला. श्री. चंद्रशेखर पाटील हे `वलाना ट्रॅक्टर्स`चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जगभरात सर्वाधिक विकले जाणारे जापनीज तंत्रज्ञानाचे कुबोटा ट्रॅक्टर्स `वलाना`ने आपल्या सुसज्ज शोरूममध्ये शेतकरीवर्गासाठी उपलब्ध केले आहेत. विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागात `वलाना ट्रॅक्टर्स`चे शेतकरी ग्राहक विखुरले आहेत. जापनीज तंत्रज्ञानाचे कुबोटा ट्रॅक्टर्स `वलाना`च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीचे भागीदार ठरले आहे. जवळजवळ 500 शेतकरी बांधवांपर्यंत `वलाना ट्रॅक्टर्स` पोहचले आहे. ट्रॅक्टर्स सर्व्हिसिंगमुळे शेतीकामांचा कुठलाही खोळंबा होऊ नये, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याबाबत `वलाना ट्रॅक्टर्स`ची टीम नेहमीच जागरूक असते. वेळेच्या आत आणि तात्काळ ट्रॅक्टर सर्व्हिसिंगच्या माध्यमातून `वलाना`ने शेतकरीवर्गात एक निराळे स्थान मिळविले आहे. `वलाना`ची मेकॅनिक टीम ट्रॅक्टर सर्व्हिसिंगसाठी थेट शेतकऱ्याच्या दारात हजर होते. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार तात्काळ ट्रॅक्टर सर्व्हिसिंग सेवा पुरविली जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, `वलाना ट्रॅक्टर्स` कोरोना काळापासून शेतकरीवर्गाला आरोग्य विम्याची सुविधा पुरवीत आहे. शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास आणि अविरत परिश्रमांतून `वलाना ट्रॅक्टर्स`ने गत दोन वर्षांत जवळपास 180 कुबोटा ट्रॅक्टर्सची दणदणीत विक्री केली आहे. आपणही `वलाना ट्रॅक्टर्स`च्या शोरूमला भेट देऊन अनुभव घ्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या महाशक्तिशाली कुबोटा ट्रॅक्टर्सचा.
धन्यवाद...!